• January 29, 2025
  • No Comment

हडपसर प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत

हडपसर प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत

    पुणे : हडपसर येथून घरी जात असताना सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने महिलेचा हात धरुन तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केले होते. या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

    शिवशंकर वैजनाथ परळीकर (वय २१, रा. श्रमिक वस्ती, कर्वेनगर) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी घडली होती.

    फिर्यादी या हडपसर येथून रिक्षाने त्यांच्या घरी मांजरी येथे जात होत्या. सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने फिर्यादी यांचा हात धरुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले़ घटनास्थळ भागातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा निष्पन्न केली. तांत्रिक तपासाद्वारे शिवशंकर परळीकर याला अटक केली.

    ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *