• January 26, 2025
  • No Comment

परवाना नसताना साऊंड सिस्टिमवर म्युझिक वाजवून नियमभंग करणाऱ्या हॉटेल बच्चुस डिनर क्लब यांच्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई

परवाना नसताना साऊंड सिस्टिमवर म्युझिक वाजवून नियमभंग करणाऱ्या हॉटेल बच्चुस डिनर क्लब यांच्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई

    हॉटेलसाठी डिस्कोथेकचा परवाना नसताना साऊंड सिस्टिमवर म्युझिक वाजवून नियमभंग करणाऱ्या राजा बहादुर मिल येथील हॉटेल बच्चुस डिनर क्लब यांच्या चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कपील फुलसे (रा. माऊलीनगर, दिघी), अनुज विनोदकुमार अगरवाल (रा. सोपानबाग, घोरपडी), जतीन राजपाल (रा. सोपानबाग, घोरपडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा बहादुर मिल येथील हॉटेल बच्चुस डिनर क्लब उर्फ बाकस या पबमध्ये डिस्कोथेक आहे. या डिस्कोथेकचा परवाना संपला असताना त्यांनी त्याचे नुतनीकरण न करता तो डिस्कोथेक चालू ठेवला होता. बंडबार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी १९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तेथे गेले होते. त्यांनी डिस्कोथेकचा परवाना तपासला, तेव्हा त्याची मुदत संपून गेली होती. असे असतानाही साऊंड सिस्टीमवर संगीत वाजवून शासकीय नियमांचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार अधिक तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *