- January 29, 2025
- No Comment
पुणे तरूणाला लाथाबुक्क्याने मारहाण मारहाणीनंतर तरूणाच्या गुप्तागाला बाम लावल्याची हादरवून टाकणारी घटना

शिक्षणाचं माहेरघर समजले जाणारे पुणे दिवसेंदिवस गुन्हेगारीचे शहर बनत चालले हे. कारण आता पुण्यातून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 20 वर्षीय तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर तरूणाच्या गुप्तागाला बाम लावल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे.विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली होती. या प्रकरणी पिडीत तरूणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेने पुणे हादरले
या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हिंजवडी पोलिसांनी श्रेयस संजय कवडे, ललित प्रमोद भदाणे आणि राम तुळशीराम गंभीरे या तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे