- January 29, 2025
- No Comment
पुण्यात GBS च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ आठवड्याभरातच पुण्यातील रुग्णसंख्या 100 च्या पुढे

पुणे : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा उद्रेक झाला आहे. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर पुण्याची आरोग्य यंत्रणा सक्रीय झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशातच मागील २४ तासांमध्ये ४ रुग्णांची वाढ झाली आहे. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 4 रुग्ण दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर रुग्णांवर उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे पालिकेनं अखेरीस मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात GBS च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याभरातच पुण्यातील रुग्णसंख्या 100 च्या पुढे गेली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नवीन प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी 50 बेडसह 15 आयसीयू आरक्षित करण्यात आले आहेत.