- January 29, 2025
- No Comment
पुणे शहरात तोडफोडीचं सत्र सुरूच! एका रात्रीत तब्बल गाड्या फोडल्या

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून पोलीस यंत्रणा हातावर हात ठेऊन बसलीये का? असे सवाल पुणेकरांकडून उपस्थित होताना दिसत आहे. एकीकडे खुन, कोयता गँग यांचं प्रमाण वाढलं असताना आता गाड्याच्या तोडफोडीची प्रकरणं समोर येत आहेत. अशातच मंगळवारी रात्री दत्तवाडी, लक्ष्मी नगर, पर्वती परिसरात तब्बल 40 गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात 40 गाड्या फोडल्या
पुण्यात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड केली गेली. काल रात्री 40 गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील दत्तवाडी, लक्ष्मीनगर, पर्वती परिसरात ही घटना घडली. चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड केल्याची माहिती मिळतीये.