• January 31, 2025
  • No Comment

पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची शहरातील हॉटस्पॉट असणाऱ्या भागांची नावे जाहीर

पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची शहरातील हॉटस्पॉट असणाऱ्या भागांची नावे जाहीर

    पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने शहरात चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुण्यातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत आहेत. अशातच आता शहरात काही हॉटस्पॉट समोर आले आहेत. जिथे गुलियन बॅरी सिंड्रोमचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात

    पुण्याच्या या भागात GBS चा कहर

    समोर आलेल्या माहितीनुसास पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी या गावांत जास्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राजाराम पूल ते खडकवासलादरम्यानच्या महापालिका हद्दीतील भागाला ‘GBS’ बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाची पथकेही या भागावर बारीक लक्ष ठेऊन आहेत

    आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

    पुणे शहरावरील GBS चे संकट गडद होत आहे. शहरात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालिकेना या रुग्णांची माहिती एकत्र करण्यासाठी जीबीएससंबंधी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 020- 25506800, 020-25501269 किंवा 020 – 67801500 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *