- January 31, 2025
- No Comment
पुणे प्रियसी सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर पुण्यात प्रियकरांने प्रेयसीची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली
पुणे : विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे प्रियसी सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर पुण्यात प्रियकराने प्रेयसीची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली. पुण्यातील रामटेकडी येथील धक्कादायक प्रकार घडला आहे. अमजद पठाण असे प्रेयसीच्या वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. पठाण याचे त्याच्या परिसरात असणाऱ्या एका महिलेसोबत प्रेम संबंध होते. परंतु काही दिवसापासून त्याची प्रेयसी त्याला बोलत नव्हती. यामुळे चिडलेल्या पठाण यांनी घरासमोर असलेल्या दोन गाड्या या पेट्रोल टाकून आज पहाटेच्या सुमारास दिल्या पेटवून दिल्या. याप्रकरणी आरोपी अमजद पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेची पुण्यात सर्वत्र चर्चा होत आहे