- January 31, 2025
- No Comment
डीपी रोड साडेसतरा नळी येथे तंबाखूजन्य स्टॉल वर कारवाई
हडपसर, काळेपडळ परिसरातील शाळांच्या १०० मीटर परिसरात अवैध पद्धतीने पानटपऱ्या सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली. हडपसर परिसरात बुधवारी (दि. २९) सकाळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर पोलिस आयुक्तांनी स्टेजवरूनच सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांना कार्यक्रम संपताच सदर टपऱ्या उचला, असे आदेश दिले
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील डीपीरोड परिसरातील वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयाच्या शंभर मीटर यार्ड अंतरामध्ये असलेल्या एकूण पाच पान स्टाॅलमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असलेल्या स्टाॅलवर व पान शॉपवर हडपसर पोलीस स्टेशन कडून तसेच मनपा अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध कोप्ता कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.