- January 31, 2025
- No Comment
पुण्यातील कोथरुड परीसरात एका तरुणावर हल्ला प्रकृती चिंताजनक

पुण्यातील कोथरुड परीसरात एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुड परिसरातील आशिष गार्डन समोर तीन जणांकडून तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ला करुन हल्लेखोर फारार झाला आहे. राहुल जाधव असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, पुण्यातील खासगी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरु आहेत.
कोथरुड परिसरातील आशिष गार्डन समोर राहुल जाधव या तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एकूण तीन जणांना हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत