• January 31, 2025
  • No Comment

पिंपरी चिंचवड मध्ये एकाच दिवशी सात जणांनी आयुष्य संपवलं

पिंपरी चिंचवड मध्ये एकाच  दिवशी सात जणांनी आयुष्य संपवलं

    पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहर परिसरामध्ये अनेकांनी टोकाची पावले उचलून आपलं जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड हद्दीत एकच दिवशी सात जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने आपलं जीवन संपवलं असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी अनेक ठिकाणी समुपदेश केले जाते. पंरतु या वाढत्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

    पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकाच दिवशी सात आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती आहे. गौरव अगम (वय वर्षे 28) या तरुणाने खिडकीतून भिंतीला आलेल्या लोखंडी ब्रकेटला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास समोर आली आहे. दुसऱ्या घटनेत प्रसाद संजय अवचट (31, रा. पुनावळे) याने सोमवारी (दि. 27) दुपारी साडेचारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

     

    तिसऱ्या घटनेत विकास मुरगुंड (35) यांनी भोसरीतील गणपत लांडगे चाळीत साडीच्या साह्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. चौथ्या घटनेत मनाप्पा चव्हाण (52, रा. शिंदेवस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी घराशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. पाचव्या घटनेत सुवर्णा श्रीराम पवार (36, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) या महिलेने घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ही घटना उघडकीस आली. सहाव्या घटनेत नवनाथ पवार (46, रा. थेरगाव) यांनी घराच्या बेडरूममध्ये बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला.

    एकाची इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी

    चिखली परिसरात घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून दिनेश सुरेश लोखंडे (40, रा. चिखली) या व्यक्तीने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या सर्व घटनांनी एकच खळबळ उडाली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *