• January 31, 2025
  • No Comment

फूटपाथवर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला २ महिलांकडून चपलेने मारहाण

फूटपाथवर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला २ महिलांकडून चपलेने मारहाण

    पुणे : फूटपाथवर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की केल्याची घटना हडपसर भागात घडली. वाहतूक पोलिसाला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधातहडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    या प्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कर्मचारी आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी आघाव हडपसर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. आरोपी महिलांनी हडपसर परिसरातील गाडीतळ भागात बेशिस्तपणे दुचाकी लावली होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास फूटपाथवर लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येत होती. वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोइंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलत होते. त्यावेळी आरोपींनी कारवाईस विरोध करून आघाव यांच्याशी वाद घालण्यास सुुरुवात केली.

    आरोपींनी आघाव यांना चपलेने मारहाण करून धक्काबुक्की केली. त्यांनी आघाव यांना धमकावले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख पुढील तपास करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *