• January 31, 2025
  • No Comment

गुंड गजा मारणेचा जयजयकार तरुणांना भोवला,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

गुंड गजा मारणेचा जयजयकार तरुणांना भोवला,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

    पुणे: खंडणीविरोधी पथकाने पुणे शहरातील गुन्हेगारी रिल्स बनवुन सोशल मिडीयावर प्रसारीत करणा-या जनांवर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मिडीया अकाऊंटवर गुन्हेगाराची उदात्तीकरण करून समाजमाध्यमांवर दहशत पसरविणारे व्हिडीओ रिल्स प्रसारीत करणार्‍यांवर  कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते,या अनुषंगाने, गुन्हेगारीची दहशत पसरविणारे व्हिडीओ रिल्सवर पोलिस लक्ष देऊन होते. त्यानुसार हमराज चौक कोथरूड पुणे येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार गजानन मारणे याच्या नावाने इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर बरेच अकाऊंट असल्याबाबत माहीती मिळाली.

    त्यानंतर एकूण १३ इंस्टाग्राम अकाउंट अॅक्टीव्हेट असल्याचे दिसून आले. त्या इंस्टाग्राम अकाऊंट मध्ये “किंग ऑफ पुणे सिटी” “मा. श्री गजानन महाराज मारणे”, पुण्यातील गुन्हेगारींची मुंबईच्या टोळयांशी हातमिळवणी, “किंग ऑफ महाराष्ट्र”,”पुण्याचा बाप कोण आहे हे अख्या पुण्याला माहित आहे” या नावाने व्हिडिओ रिल्स, “यहा का मै हु किंग, और मेरे चलते हे रूल्स और उन रुल्स को आपने हिसाब से बदलता रहता हु, तो उने चुपचाप फॉलो करो, अगर इसके अलवा और कुछ करने की कोशिस की, तो तेरे टुकडे टुकडे करके ताश तरह फैला दूंगा”, तसेच “KING OF PUNE CITY,” “जस मुंबईत एकच दादर तसच पुण्याचा एक FATHER”, ड्रोन कॅमेराचा व वापर करुन गज्या मारणेच्या गाड्या, ताफा, फोटो वापरून गुन्हेगाराची उदात्तीकरण करून समाजामध्ये भीती व दहशत पसरविणे अशा प्रकारचे व्हिडीओ रिल्स, फोटो प्रसारीत केल्याप्रकरणी १) अक्षय निवृत्ती शिंदे नय २० वर्षे रा. निमगाव खालु, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर, २) सिद्धार्थ विवेकानंद जापन १२ वर्षे रा. विठठल मंदिराच्या मार्ग, महमंदवाडी, हडपसर पुणे, ३) साहिल शादुल शेख वय १२ वर्षे रा. सुंबा, धाराशिव ४) इरफान हसन शेख वय १९ वर्षे रा. सुंबा धाराशीव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी 13 इंस्टाग्राम अकाऊंट धारकांच्या विरोधात पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरुड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढे अशा प्रकारचे रिल्स बनवून सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर टाकणारे व्यक्ती विरुध्द कारवाई सुरु राहणार आहे.पुढील तपास कोथरूड पोलीस करीत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *