• February 1, 2025
  • No Comment

सिंहगड रोड पोलीसांकडून सराईत चोरट्यांकडून 5 मोटारसायकली, 2 घरफोडीमधील 2 लॅपटॉप, एक कॅमेरा जप्त

सिंहगड रोड पोलीसांकडून सराईत  चोरट्यांकडून 5 मोटारसायकली, 2 घरफोडीमधील 2 लॅपटॉप, एक कॅमेरा जप्त

पुणे : बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन पकडलेल्या दोघा चोरट्यांकडून सिंहगड रोड पोलिसांना ५ मोटारसायकली, २ घरफोडीमधील २ लॅपटॉप आणि एक कॅमेरा हस्तगत करण्यात यश आले आहे.

सोपान रमेश तोंडे (वय २७, रा. साईनाथ वसाहत, शास्त्रीनगर, कोथरुड, मुळ रा. खोचरे बेलावडे, ता. मुळशी) आणि आकाश सुनिल नाकाडे (वय २९, रा. नाईक आळी, धायरी गाव, मुळ रा. सुभाषनगर, बार्शी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे यांना बातमी मिळाली की, दोघे जण चोरीच्या अ‍ॅक्टीव्हावरुन नवले पुलाजवळ येणार आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला. नवले पुलाकडून वडगावच्या दिशेने येत असलेल्या दोघांना पोलिसांनी अडविले. त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडील अ‍ॅक्टीव्हा ही नर्‍हेगाव येथील कृष्णा रेसिडेन्सी येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करुन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून सिंहगड रोडमधील ३ गुन्हे, अंलकार येथील एक असे चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच फरासखाना व मार्केटयार्ड येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यातील लॅपटॉप आणि कॅमेरा जप्त करण्यात आला आहे. एका हिरो स्प्लेंडर मोटारसायकलच्या मालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर,आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, देवा चव्हाण, सागर शेडगे,विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडुळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते यांनी केली आहे.

Related post

सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करणाऱ्या तहसीलदारासह ६ जणांना बेड्या

सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत…

पेण: इतिहासात असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्याची स्थापना केली, त्यापैकी एक,नरवीर सरदार वाघोजी तुपे,नामदार खान हा अबझल खाणाचा मावसभाऊ…
इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट समितीवर वाळुंजकर यांची नियुक्ती 

इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट समितीवर वाळुंजकर यांची नियुक्ती 

पिंपरी: कौशल्य विकास, नाविन्यता व रोजगार विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरती मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार सदस्यांची…
पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात ठोकल्या बेड्या

पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात…

पुणे: पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सकाळी भर चौकात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *