- February 1, 2025
- No Comment
अट्टल गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुस हस्तगत

पुणे : दरोडा, आर्म अॅक्ट, बेकायदा जमाव जमवणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या व पोलिसांनी मोक्का कारवाई केलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडून वाकड पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुस हस्तगत केले आहे
समीर नवाब शेख (वय २७, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून ५२ हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. शेख याच्याविरुद्ध २०१८ पासून ८ गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडा, बेकायदा जमाव जमवणे, बेकायदा शस्त्र बाळगणे यांचा समावेश आहे. त्याच्यावर २०२२ मध्ये मोक्का कारवाई करण्यात आली होती.
बेकायदा शस्त्र बाळगणारे, खरेदी विक्री करणार्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिले होते. वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक २९ जानेवारी रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, ताथवडे येथील मयुर लॉज जवळ सर्व्हिस रोडवर एक जण पिस्टल बाळगून आहे. या बातमीनुसार ताथवडे सर्व्हिस रोडवर पोलिसांनी समीर शेख याला पकडले. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस मिळाले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, बिभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार संदिप गावारी, चंदु गिरे, ज्ञानदेव झेंडे, कौतेंय खराडे, सौदागर लामतुरे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दीपक साबळे यांनी केली आहे.