• February 2, 2025
  • No Comment

कंपनीत गुंतवणूक केल्यास तिप्पट मोबदला देतो, असे सांगून तरुणास दोन कोटीला गंडा

कंपनीत गुंतवणूक केल्यास तिप्पट मोबदला देतो, असे सांगून तरुणास दोन कोटीला गंडा

    पिंपरी : कंपनीत गुंतवणूक केल्यास तिप्पट मोबदला देतो, असे सांगून तरुणास दोन कोटी एक हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही मोबदला न देता त्याची फसवणूक केली. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे व बावधन येथे जानेवारी ते नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

    याप्रकरणी मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथील ३७ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३१ जानेवारी) फिर्याद दिली. अनिष आचार्च, मनिष कुमार अगरवाल, पराग गर्ग, मुकुल जैन यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४२०, ४०६, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबधाचे रक्षण करणेबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व शेती व्यवसाय आहे. संशयितांनी त्यांच्या प्रिविन प्रेपरेटिव्ह प्रा. लि. (पत्ता ए ६१, तिसरा मजला, सेक्टर ६५, नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तरप्रदेश) या कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. दुप्पट-तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यातून वेळोवेळी रोख, आरटीजीएस व आयएमपीएसव्दारे दोन कोटी एक हजार रुपये ठेव स्वरुपात घेऊन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी तिप्पट मोबदला देतो, असे सांगितले. मात्र, फिर्यादीला कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत न देता विश्वासघात करून फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक सागर ठाकरे तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *