• February 2, 2025
  • No Comment

अंमली पदार्थाची तस्करी करुन तिच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

अंमली पदार्थाची तस्करी करुन तिच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

    पुणे : अंमली पदार्थाची तस्करी करुन तिच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ९८ हजार २६० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शिवलिंग नागनाथ आवटे (वय ३९, रा. शंभु रेसिडेन्सी, मांगडेवाडी, कात्रज) असे या तस्कराचे नाव आहे.

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवून जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मांगडे वाडी येथील पुणे सातारा रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर शिवलिंग आवटे हा संशयास्पद रित्या थांबला होता. पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली. त्यात त्याच्याकडे चरस, दोन मोबाईल व रोख रक्कम असा १ लाख ६९ हजार रुपयांचा माल आढळून आला.

    ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेशा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, सचिन माळवे, विपुल गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *