- February 4, 2025
- No Comment
धक्कादायक!बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार, तरुण गंभीर जखमी

बिबवेवाडी: पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही घटना बिबवेवाडी पोलिस चौकीपासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या वीर बाजी पासलकर कमानी खाली दिवसाढवळ्या दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.
त्यामुळे पुण्यातील गुंडांना पोलिस, कायद्याचे अजिबात भय राहिले नसल्याचे पुन्हा सिध्द झाले.
पवन सुभाष गवळी, वय २८ वर्ष राहणार बिबवेवाडी असे गोळबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पवन याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्लेखोर पळून गेले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन गवळी हे बॅण्ड पथक चालवितात. लग्नातील एका बॅण्ड पथकाची ऑर्डर घेऊन ते मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. संविधान चौकाकडून व्हीआयटी कॉलेजकडे जात असताना संविधान चौकाजवळच एका गल्लीतून चार हल्लेखोर चालत आले. त्यांपैकी दोघांच्या हातात पिस्तूल होती तर दोघांच्या हातात तलवाली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी पवन याला तलवारीचा धाक दाखवून थांबविले आणि काही बोलायच्या आतच दुसऱ्या दोघांनी पिस्तुलातील गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी पवन यांना लागली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला