• February 4, 2025
  • No Comment

कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एक सराईत गुन्हेगार जेरबंद, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी, एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त

कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एक सराईत गुन्हेगार जेरबंद, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी, एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त

    शिरुर: शिरुर बाह्यमार्गावर ‘दि नाना स्पॉट’ ढाब्याजवळ कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असुन त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ४० हजार५०० रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.

    दिपक बबन गुंजाळ (रा. गोलेगाव रोड, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, दि १ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करत असताना या पथकाला गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक गुंजाळ हा कमरेला पिस्तूल लावून शिरुर बाह्य महामार्गावर बंद असलेल्या ‘दी नाना स्पॉट’ धाब्याजवळ उभा आहे अशी माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने ‘दी नाना स्पॉट’ धाब्यावर सापळा रचून आरोपीला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा एकूण ४० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

    सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन, मंगेश थिगळे, सागर माळ यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन करत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *