- February 4, 2025
- No Comment
पुण्यात हिंदू महिलेवर धर्मांतराचा दबाव, ‘लव्ह जिहाद’चा गंभीर आरोप

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा आरोप भाजप नेत्या मंजुषा नागपुरे आणि भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी केला आहे.
नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकरणात ३२ वर्षीय हिंदू विधवेवर मुस्लिम व्यक्तीने जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर आरोपी अकबर बहादूर शेख याने तिचा विश्वास संपादन करत जवळीक साधली. त्यानंतर, तिच्या भविष्यनिर्वाह निधीतील आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ३२ लाख रुपये हडपल्याचा आरोप आहे. महिलेने जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याचा गंभीर दावा केला आहे.




