- February 4, 2025
- No Comment
हडपसर रेल्वे स्टेशनजवळील घटना,भेटायला बोलावून जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणाला लुबाडले
हडपसर: या सोशल नेटवर्किंगवर झालेल्या ओळखीतून भेटायला बोलावून जीवे मरण्याची धमकी देऊन दोघांनी गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीन चोरुन नेल्याचा प्रकार हडपसर रेल्वे स्टेशनजवळ असाच प्रकार घडला आहे.
याबाबत वैदवाडी येथे राहणार्या एका २४ वर्षाच्या मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसर रेल्वे स्टेशनजवळील लक्ष्मी लॉन्सचे समोर मुंढवा येथील मोकळ्या जागेत २३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राइंडर या सोशल नेटवर्किंग साईटवर फिर्यादी यांची बापू नावाच्या तरुणाबरोबर ओळख झाली. त्यानंतर त्याने तुला भेटायचे आहे,असे सांगून भेटायला बोलावले. मुंढवा येथील मोकळ्या जागेत ते बापू याला भेटायला गेले होते. त्यावेळी दोघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या तरुणाने आपली बदनामी होईल, म्हणून ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. शेवटी त्याने धीर करुन पोलिसांकडे जाऊन याची माहिती दिली.