• February 4, 2025
  • No Comment

माहेर 28 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

माहेर 28 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

पाहुण्यांचे मुलांनी व परदेशी पाहुण्यांनी स्वागत गीत म्हणून स्वागत केले  त्यानंतर मुलांनी आपल्या विविध नृत्यांनी पाहुण्यांचे मन हे प्रसन्न केले आलेल्या पाहुण्यांचे हस्ते वृक्षांना पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली, कार्यक्रमाला उपस्थित मनीषाताई कटके, यांचा सन्मान आदरणीय सिस्टर लुसीयांच्या हस्ते करण्यात आले

आलेल्या सर्व पाहुण्यांची सिस्टर लुसी कुरियन यांनी माहेरची शॉल सह श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मनीषाताई कटके यांनी त्यांच्या मनोगतातून माहेरच्या कार्याचे कौतुक केले व माहेरला कुठल्याही कामाची गरज भासल्यास आम्ही माहेर सोबत सदैव आहे असे त्यांनी आश्वासन दिले व त्यांनी माहेरचे व आदरणीय दीदी यांचे कामाचे कौतुक केले, सर्व पाहुण्यांचे माहेरच्या मुलांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले व नृत्य सादर करून माहेरच्या मुलांनी सर्व पाहुण्यांचे मन हे जिंकले. आमदार बापूसाहेब पठारे यांनी माहेरला आश्वासन दिले की शासनाकडून जी कुठली मदत माहेरला लागल ती मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल व यापुढे माहेरला कुठलीही अडचण आल्यास मी सदैव तत्पर असेल व आदरणीय दीदी यांना त्यांनी आश्वासन दिले की आपण मुंबईला जाऊन आपण आपल्या माहेरचे कार्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून माहेरला शासनामार्फत जी मदत मिळेल ती मिळवून देण्याचा प्रयत्न करू. व माहेर मध्ये काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे व गृहमातांचे व रथसारथी यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थिती मध्ये आ.बापूसाहेब पठारे ,प्रकाश धोका सर अजय राऊत ,अर्चना राऊत (बालकल्याण समिती क्रमांक 1 सदस्य),हेलन दीदी,निकोला दीदी,शशिकांत गोरे,पत्रकार सोमनाथ आव्हाळे,पत्रकार जितेंद्र आव्हाळे, पत्रकार नितीन शिंदे,जयंत पवार,स्टॅन्लीसर कर्नल,बालकल्याण समितीच्या सहाय्यक पदाधिकारी 1 विद्या पाटील बालकल्याण समितीच्या सहायक पदाधिकारी 2 अर्चना राऊत बालकल्याण समिती 1 चे सदस्य आनंद शिंदे,विजय साळवे सर,शामा भोसले सामाजिक कार्यकर्ता,बॅटिस्ट मोराईस

कोल्हापूर,मनीषा माऊली आबा कटके,गणेश चव्हाण मोठ्या संखेने पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होतें.सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक रमेश दुतोंडे प्रास्ताविक अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी तर आभार प्रदर्शन विजय तवर यांनी केले.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *