• February 5, 2025
  • No Comment

दारू पिण्यासाठी पैसे हिसकावत धारदार शस्त्राने वार करून केली हत्या; तीन आरोपी गजाआड

दारू पिण्यासाठी पैसे हिसकावत धारदार शस्त्राने वार करून केली हत्या; तीन आरोपी गजाआड

    पिंपरी-चिंचवड: चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील वन विभागाच्या जागेत एका ३३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून तसेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. याबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

    या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरु आहे.

    पिंपरी चिंचवड शहर हद्दीत असलेल्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीत भैय्या गमन राठोड (वय ३३) या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे बळकवताना आरोपींनी भैय्या गमन राठोड याच्यावर धारदार शस्त्राने वार करून तसेच त्याच्या तोंडावर दगड घालून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु होता.

    दरम्यान सदरच्या खून प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसताना देखील पिंपरी- चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक एक पथकाने अवघ्या २४ तासाच्या आत खून करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सुरज हनुमंत इंगळे, मेहुल कैलास गायकवाड आणि अजय अशोक कांबळे या तीन आरोपींनी मिळून भैय्या गमन राठोड या तरुणाचं खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

    दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता भैय्या गमण राठोड याचा खून करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा चिखली, पिंपरी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *