• February 5, 2025
  • No Comment

पान टपरीचालकांच्या गल्ल्यात हात घालून लुबाडणारा गुंड गजाआड ! पुणे स्टेशन जवळील घटना

पान टपरीचालकांच्या गल्ल्यात हात घालून लुबाडणारा गुंड गजाआड ! पुणे स्टेशन जवळील घटना

    पुणे: पान टपरीचालकाला लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी करुन गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेणाºया गुंडाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

    आनस खान (वय २४, रा. चुडामण तालीम) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत जुनैद निहाल खान (वय २४, रा. साईबाबनगर, शालीमार हिल पार्क, कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे स्टेशन पार्सल गेटजवळ ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुनैद खान यांची पान टपरी आहे. ते पान टपरीवर असताना आनस खान त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्याने फिर्यादीला लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी केले. पान टपरीच्या गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. परिसरात दहशत निर्माण केली. तसेच शेजारच्या टपरीवर जाऊन त्या टपरीच्या गल्ल्यातील जबरदस्तीने ५ हजार रुपये काढून घेऊन दुचाकीवरुन निघून गेले. जाताना का वॅगनर गाडीवर हातातील लोखंडी हत्याराने मारुन काचा फोडून गाडीचे नुकसान केले.

    बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *