• February 5, 2025
  • No Comment

सायबर चोरट्यांचा धुमाकुळ, शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ६७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांचा धुमाकुळ, शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ६७ लाखांची फसवणूक

    पुणे: सायबर चोरट्यांकडून नागरिकांना शेअर बाजारात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना सुरूच आहेत. सायबर चोरट्यांनी येरवडा आणि कोथरूड परिसरातील दोघांची ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    याबाबत वडगाव शेरीतील सनसिटी परिसरातील एका ५७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मागील नोव्हेंबर महिन्यात संदेश पाठविला. जादा पैशांच्या आमिषाने तक्रारदाराने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ४७ लाख ४३ हजार रुपये जमा केले. परंतु चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर करीत आहेत.

    तसेच, कोथरूडमधील गांधी भवन परिसरातील एका ४८ वर्षीय व्यक्तीला टेलिग्रामच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत लिंक पाठवली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी जादा पैशांचे आमिष दाखवून २९ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *