• February 5, 2025
  • No Comment

थेऊर येथे बारावीच्या विद्यार्थिनीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

थेऊर येथे बारावीच्या विद्यार्थिनीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

    थेऊर: बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली असून मंगळवारी (ता.4) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

    दिशा बाबासाहेब आखाडे (वय 19, रा. थेऊर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिशा ही मंगळवारी दुपारच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गेली होती. चार वाजले तरी तीने दरवाजा उघडला नव्हता. म्हणून दिशाची आई व छोटी बहिण दार उघडण्यासाठी आवाज देत होते. त्यानंतर त्यांनी जोरजोराने दरवाजा वाजविला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दिशाच्या आईने व बहिणीने जोराने दरवाजा ढकलला. तेव्हा दरवाजा उघडला. बेडरूममध्ये जाऊन पहिले असता, दिशाने साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

    या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस मित्र संतोष गायकवाड व राहुल गायकवाड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने दिशाला खाली काढले. व लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दिशाचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

    दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी दिशाचा मृत्यूदेह ताब्यात घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. दिशाने आत्महत्या का केली? याचे खरे कारण अद्याप समोर आले नसले, तरी त्या दुष्टीकोनातून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *