• February 5, 2025
  • No Comment

पार्ट टाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाची 25 लाखांची फसवणूक, सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पार्ट टाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाची 25 लाखांची फसवणूक, सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

    पुणे: पार्ट टाइम नोकरीच्या आमिषाने एका तरुणाची 24 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येवलेवाडीत राहणार्‍या 34 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत पार्ट टाइम नोकरी असल्याचे सांगून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला फिर्यादी तरुणाला ऑनलाइन पद्धतीने काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. पैसे मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी पैसे जमा करण्यास सांगितले.

    या कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाकडून वेळोवेळी 24 लाख 47 हजार घेतले. त्यानंतर तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *