• February 5, 2025
  • No Comment

डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

    पुणे: भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना डेक्कन जिमखाना भागातील खंडोजीबाबा चौकात घडली.

    विनायक साहेबराव थेटे (वय ३०, कोल्हार, भगवतीपूर, ता. राहता. जि.अहिल्यानगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विनायक यांचे काका राहुल थेटे (वय ३४, रा. रहाटणी, पिंपरी-चिंचवड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विनायक रविवारी रात्री अकराच्या सुमारास डेक्कन जिमखाना भागातील खंडोजीबाबा चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार विनायक यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनायक यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *