• February 5, 2025
  • No Comment

पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने केली बेदम मारहाण, आरोपी युवती अटक

पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने केली बेदम मारहाण, आरोपी युवती अटक

    म्हाळूंगे: पुणे शहरातील म्हाळूंगे परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृध्द महिलेची रेकी करून युवतीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    त्यानंतर मारहाण करत जवळ असलेले सोनं लुटण्याचा प्रयत्न केला. वृध्द महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी मदतीला धावून आले. त्यांनी युवतीला पकडून ठेवले. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. बावधन पोलिसांनी युवतीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार 31 जानेवारीला घडला आहे.

    व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, युवती आणि हल्ला झालेली वृध्द महिला आणि शेजारील लोक व्हिडिओमध्ये दिसत आहेत. युवती पोलिसांच्या भीतीने मी सोनं परत देते पण, मला जाऊ द्या म्हणताना दिसते. तर वयोवृध्द महिला ही घटना नेमकी कशी घडली ते सांगताना दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला आहे.

     

    चोरी करणारी एक वीस वर्षाची युवती वयोवृध्द महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर गेली. वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली, तोच तिच्या मागोमाग जाऊन तिने वृध्द महिलेवर जीवघेणा हल्ला केला. गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले, अजून काय आहे सांग अशी धमकी दिली. वयोवृध्द महिला प्रतिकार करत होती. पण, तिला ओढून बाथरूमच्या संडासच्या भांड्यात तिचे डोके कोंबले, वरून पाणी सोडले, गुदमरून महिला मारणार तेवढ्यात तिने डोकं फिरवले, मला मारू नकोस, तुला कानातील व इतर सगळं सोनं, पैसे देते, मला सोड, असे म्हटले.

     

    वृद्ध महिलेनी कानाला कुडक्या काढण्यास हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली आणि मोठ्याने ओरडली मला वाचवा. समोर एका कुटूंबातील एक महिला गॅलरीत उभी होती, तिने मुलांना हा प्रकार सांगितला आणि हे सर्वजण काही वेळात तेथे पोहचले आणि दार तोडून महिलेला वाचवले. युवतीला त्यांनी पकडून ठेवले. आपण अडकले जाणार हे लक्षात येताच युवतीने बॅगेतील गंठण काढून दिले. बावधन पोलिसांनी या युवतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *