• February 7, 2025
  • No Comment

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून  अटक

    पुणे : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ किलो ८०१ ग्रॅम गाजा हस्तगत केला आहे.

    नितीन भाऊसाहेब गोपाळ (वय २०, रा. दत्त दिगंबर सोसायटी, साखरी रोड, धुळे), लकी छोटु पवार (वय १९, रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, साखरी रोड, धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रोडवरील सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गेटसमोर दोघे जण संशयस्पदरित्या थांबलेले आढळून आले. त्यांना पकडून त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे ९६ हजार २० रुपयांचा ४ किलो ८०१ ग्रॅम गांजा, २ मोबाईल असा १ लाख १६ हजार २० रुपयांचा माल आढळून आला. दोघेही मुळचे धुळे जिल्ह्यातील असून त्यांनी हा गांजा कोठून आणला याचा पोलीस तपास करीत आहेत.

    ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सिंहगड पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, ज्ञानेश्वर घोरपडे, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, उदमले, खुटवड यांनी केले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *