• February 9, 2025
  • No Comment

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला करणाऱ्याला पकडून पोलिसांनी काढली धिंड

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला करणाऱ्याला पकडून पोलिसांनी काढली धिंड

हडपसर : फुरसुंगी येथील भेकराई नगर येथे सासवड रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने त्याने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घातला. त्याला पकडून त्याची धिंड फुरसुंगी पोलिसांनी काढून पोलिसांवर हल्ला केल्यावर काय होईल. हे दाखवून दिले.या हल्ल्यात पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) गंभीर जखमी झाले होते. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती यानंतर व्हिडीओ वायरल झाला होता. ट्राफिक हवालदार यांना डोक्यात दगड घालून जखमी केलेला आरोपी आदिनाथ ऊर्फ बबलू भागवत मसाळ रा. कोलवडी, मुरकुटे वस्ती याला उस्मानाबाद येथून अटक करून भेकराई नगर येथून आज सायंकाळी वाजता धिंड काढण्यात आली.यावेळी फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे उपस्थित होत्या. पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी ते भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातून एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *