• February 9, 2025
  • No Comment

मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडूण काकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून

मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडूण काकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून

    पुणे : मालमत्तेच्या वादातून पुतण्याने काकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना पाषाण गावातील कोकाटे आळीत शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी पुतण्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महेश जयसिंगराव तुपे (वय ५६, रा. विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण गाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०), ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, तिघे रा. पाषाण गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश तुपे यांचा मुलगा वरद (वय १९) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा महेश तुपे यांचा पुतण्या आहे. त्यांच्या मालमत्तेवरुन वाद सुरू होता. महेश आणि शुभमची आई यांचे एकत्र बँक खाते आहे. एकत्र बँक खात्यातील पैशांची मागणी शुभमने काका महेश यांच्याकडे केली होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

    शुभमने मित्र रोहन, ओम यांना हाताशी धरुन काका महेश यांचा खून करण्याचा कट रचला. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास महेश पाषाण गावातील कोकाटे आळीतून दूध आणण्यासाठी निघाले होते. आरोपी शुभम, रोहन आणि ओम कोकाटे आळीतील गणपती मंदिराजवळ दबा धरून बसले होते. आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या महेश यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, चतु:शृंगी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी ननावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *