• February 9, 2025
  • No Comment

US POLO कंपनीचे नाव व लोगो वापरुन बनावट शर्टची विक्री करणार्‍यां दोन दुकानांवर पोलीसांकडून कारवाई

US POLO कंपनीचे नाव व लोगो वापरुन बनावट शर्टची विक्री करणार्‍यां दोन दुकानांवर पोलीसांकडून कारवाई

    पुणे : US POLO कंपनीचे नाव व लोगो वापरुन कॉपीराईट कायद्याच्या भंग करुन बनावट शर्टची विक्री करताना पोलिसांनी दोन दुकानांवर कारवाई करुन तेथून ४ लाख ८ हजार ५०० रुपयांचे ८१७ शर्ट जप्त केले आहेत.

    याबाबत मंगेश जगन्नाथ देशमुख (वय ४५, रा. वारजे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविशा मौला सय्यद (रा. उरुळी कांचन) आणि स्वरुपसिंग अशोकसिंग राजपुरोहित (रा. कदमवाक वस्ती, हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना माहितीगाराकडून माहिती मिळाली की, लोणी स्टेशन येथील ए टु झेड कलेक्शन आणि कदमवाक वस्ती येथील रॉयल फिल लाईफ स्टाईल यादुकानांमध्ये यु एस पी ए या कंपनीचे कॉपीराईट केलेले बनावट कपडे विक्री होत आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी ए टु झेड कलेक्शन या दुकानावर छापा घातला. तेथे पहाणी केल्यावर यु एस पी ए कंपनीचे कॉपीराईट केलेले कपडे डिस्काऊंट रेट मध्ये शर्ट ५०० रुपयांना विक्री करीत असल्याचे दिसून आले. या दुकानात १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे ३६९ शर्ट व टी शर्ट मिळून आले. त्यानंतर रॉयल फिल लाईफस्टाईल या दुकानावर छापा टाकला. तेथे २ लाख २४ हजार रुपयांचे ४४८ शर्ट मिळून आले. दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *