• February 9, 2025
  • No Comment

शिरुर तालुक्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणारा गजाआड; वाशिममधील चोरट्याकडून ११ दुचाकी जप्त

शिरुर तालुक्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणारा गजाआड; वाशिममधील चोरट्याकडून ११ दुचाकी जप्त

    पुणे : शिरुर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलीस थेट पोलीस वाशिमला पोहचले. त्यांनी तेथून एका सराईत वाहन चोरट्याला पकडून त्यांच्याकडून तीन जिल्ह्यातील ११ मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

    संतोष ऊर्फ शरद गजानन इंगोले (रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि. वाशिम) असे या चोरट्याचे नाव आहे. इंगोले हा सराईत वाहन चोरटा असून त्याच्याविरुद्ध जळुका पोलीस ठाणे (वाशिम), मालेगाव पोलीस ठाणे (वाशिम), पातुर पोलीस ठाणे (अकोला), जामनेर पोलीस ठाणे (जळगाव), लोणार पोलीस ठाणे आणि मेहकर पोलीस ठाणे (बुलढाणा) येथे दुचाकी चोरीचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.

    याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळात झालेल्या मोटारसायकल चोरी उघडकीस आणण्याच्या दृष्टीने शिरुर पोलीस ठाण्यातील वेगवेगळी पथके कार्यरत होती. पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांनी मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे संतोष इंगोले याचा मोटारसायकल चोरीमध्ये हात असल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलिसांनी वाशिममधील मालेगाव येथून संतोष इंगोले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत वाशिम येथून चोरीच्या ११ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मोटार सायकलीमध्ये धाड पोलीस ठाणे (बुलढाणा), आळंदी पोलीस ठाणे – २ , चाकण, खडकी, महाळुंगे, दिघी, शिरुर, भोसरी एमआयडीसी येथील प्रत्येकी एक व इतर एक असे ११ गुन्हे उघडकीस आणून ६ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाह, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रवींद्र आव्हाड यांनी केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *