- February 10, 2025
- No Comment
पुण्यातील येरवड्यात एका तरुणाचं अपहरण करून त्याला निर्दयपणे मारहाण इन्स्टावर स्टोरी अपलोड

पुणे : पुण्यातील संघटित गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. सध्या पुण्यात गुन्हेगारीचं भयावह वास्तव पाहायला मिळत आहे. येरवड्यातील RS कंपनी टोळीने एका तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ चित्रित करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. मारहाण करताना संबंधित तरुणाला “कुत्रा” असे संबोधण्यात आले. “दुश्मन टोळीसोबत का फिरतोस?” असा आरोप करत आरोपींनी त्याला निर्दयपणे मारहाण केली.
या घटनेमुळे संबंधित तरुण प्रचंड भयभीत झाला असून त्याच्या कुटुंबीयांनी काही काळासाठी त्याला नातेवाईकांच्या घरी ठेवले आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे
अनसफ हसनेन अश्रफ असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून, २७ जानेवारी रोजी त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपी विकी ऊर्फ विजय कंबळे, तुषार शेठे आणि शैलेश ससाणे यांना अटक केली आहे. या प्रकरणी तरुणाच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे.




