• February 10, 2025
  • No Comment

पुणे : आमची अटक बेकायदेशीर, आमची सुटका करा कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अग्रवाल दाम्पत्याची याचिका

पुणे : आमची अटक बेकायदेशीर, आमची सुटका करा कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील  अग्रवाल दाम्पत्याची याचिका

    पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती.

    दरम्यान, आम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या संविधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, असा दावा करत सुटका करण्याची मागणी करणारी याचिका शिवानी अग्रवाल आणि विशाल

    अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम मोडक यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या याचिकेसह अशाच प्रकारच्या ४० याचिका दोनपेक्षा जास्त न्यायमूर्ती असलेल्या खंडपीठाकडे पाठविल्या आहेत. अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे

    नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.

    शिवानी अग्रवाल यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे समोर आले होते. तर विशाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन

    विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी अग्रवाल यांचे रक्त घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र, अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नाही असे नमूद करत अग्रवाल दाम्पत्याचे वकील यांनी याचिका दाखल केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *