- February 10, 2025
- No Comment
सासवड कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बेशिस्त ‘बुलेट’ स्वारांवर दंडात्मक कारवाई

पुणे : बुलेटच्या फायरिंगमध्ये कृत्रिम बदल करून कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींवरून १३ बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून ३५ हजार
रुपयांचा दंड वसूल केला असून, मोठ्या रोलरखाली सर्व ‘बुलेट’चे सायलेन्सर नष्ट केल्याची कारवाई पोलिस निरीक्षक हृषीकेश अधिकारी आणि भोर उपविभागीय पोलिस अधीक्षक तानाजी बर्डे यांच्या पथकाने
केली आहे. सासवड शहरात सध्या अशा प्रकारच्या बुलेट भरधाव वेगात रस्त्यांवरून धावत असतात. यातील काही जण अल्पवयीन असून, चालकांकडे वाहन परवाने नाहीत, अशा लेखी तक्रारी प्राप्त झाल्याने कारवाई करण्यासाठी
अनेक रस्त्यांवर पोलिस पथके नेमण्यात आली आणि धडक कारवाई करण्यात आली.
सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे, उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, गणेश पाटील, सहायक फौजदार जयसिंह जाधव, हवालदार लियाकत अली मुजावर, तेजस शिवतारे, वाहतूक विभाग हवालदार संतोष शिंदे, योगेश गरुड आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.




