• February 14, 2025
  • No Comment

पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

    पुणे: पुणे जिल्ह्यातील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आहे.

    या घटनेत विक्रम गुरुस्वामी रेड्डी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

    चाकण एमआयडीसीमध्ये काही दिवसांपुर्वी गोळीबार झाला होता. चुलत भावाने भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. कौटुंबिक वाद आणि ईर्षा यातून जीवे मारण्याची सुपारी दिली होती. संग्राम सिंग असे सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे. त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंगवर गोळीबार झाला होता.

     

    गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडे याला उत्तर प्रदेशातून अटक केल्यावर चुलत भावाचे बिंग फुटले. अजय आधी संग्राम कडे कामाला होता, अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेचं आणले होते. मात्र अजय मोठा होऊ लागला, हे संग्रामला पाहवत नव्हते. यातून संग्रामने अजयची सुपारी दिली आणि सगळा प्रकार घडला. या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ही आला होता. पिंपरी चिंचवड पोलीस काय-काय तपास करत आहेत, याची ही माहिती तो घेत होता. मात्र अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचे उघडकीस झाले. हे ऐकून अजयला मात्र विश्वास बसेना. मी ज्याला आदर्श मानत होतो, तोच माझ्या जीवावर उठला. हे उघडकीस झाल्यावर त्याला मोठा धक्का बसला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *