• February 14, 2025
  • No Comment

अवैध पार्टीशन करुन शाळेतील व कॉलेज मधील मुलांना कॅफे मध्ये अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या कॅफेचालकाचा विरोधात गुन्हा

अवैध पार्टीशन करुन शाळेतील व कॉलेज मधील मुलांना कॅफे मध्ये अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या कॅफेचालकाचा विरोधात गुन्हा

    शिरूर : कॅफे मध्ये अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या शहरातील रेव्हन्यू कॉलनीतील ‘द स्टीम रुम कॅफे’ चालकावर पोलीसांनी कारवाई करत ऋषीकेश रामदास ढवळे वय २३ वर्ष रा. ढवळगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर याचे विरूद गुन्हा दाखल केला आहे .

    याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकानी त्याचे कॅफे हॉटेल मध्ये अवैध पार्टीशन केल्याने शाळेतील व कॉलेज मधील मुले मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक संदेश केजळे यांना मिळाली होती

    त्यानुसार महिला पोलीस हवालदार जाधव पो.कॉ. शिंदे, पो.कॉ थोरात पो.कॉ आव्हाड यांनी साध्या वेषात शहरातील रेव्हेन्तू कॉलनी येथील द स्टीम रुम कॅफे येथे जावुन नाष्टा ऑर्डर देवुन तेथे ते बसले असता त्यांना काही मुले व मुली येवुन कॅफे चालकाने पार्टीशन केलेल्या रूमध्ये बसुन असभ्य व अश्लील कृत्य करताना मिळुन आले तसेच आणखी काही शाळकरी मुले व मुली देखील तेथे येत असल्याचे दिसुन आले.

    याबाबत शिरूर पोलीस स्टेशचे पो.कॉ रविंद्र बापुराव आव्हाड यांनी स्टेशन य कॅफे चालक ऋषीकेश रामदास ढवळे (वय -२३ ) वर्ष रा. ढवळगाव, ता.श्रीगोंदा जि. अहील्यानगर याचे विरुध्द शाळकरी मुला मुलीना अश्लील वर्तन करण्यास मुभा दिल्याबददल गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे याचे मार्गदर्शना खाली सहायक फौजदार साबळे हे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केजळे, पो.स.ई शुभम चव्हाण, पोहवा जाधव पो अं रावडे पो.अं. सचिन भोई पो.अं शिंदे पो.अं. आव्हाड पो.अ. थोरात यांनी केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *