• February 14, 2025
  • No Comment

मोक्का गुन्ह्यामधील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त

मोक्का गुन्ह्यामधील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त

    पुणे : शहरात राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने मोक्का गुन्ह्यामधील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे. अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

    शहर पोलीस दलाकडून १३ फेब्रुवारी रोजी कोबिंग ऑपरेशन आयोजित केले होते. या दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक लोणी काळभोर परिसरात गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्हेगार अनिकेत गुलाब यादव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

    ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *