• February 10, 2025
  • No Comment

पुण्यात आगीची घटना, इमारतीला आग; घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात आगीची घटना, इमारतीला आग; घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

    पुणे: कोंढवा परिसरातील सन श्री बिल्डिंग या निवासी इमारतीमध्ये  भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. ही आगीची घटना एनआयबीएम रोडवरील एका इमारतीत घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील प्रसिद्ध सनश्री बिल्डिंग मध्ये अचानक आगीचे लोट दिसून आले. स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नेमकी आग कशामुळे लागली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किट किंवा गॅस गळती

    यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विद्युत तांत्रिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली असून, याबाबत सखोल तपास सुरू आहे. इमारतीत अडकलेल्या काही रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात

    आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग आटोक्यात आली  त्याचबरोबर या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मारा सुरू केला आहे. आगीचा इतर मजल्यांवर फैलाव होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले . काही रहिवाशांनी इमारतीतील सुरक्षितता उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *