• February 16, 2025
  • No Comment

दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक टोळक्याने ५ महिन्यात परत २५ दुचाकी चोरल्या

दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक  टोळक्याने ५ महिन्यात परत २५ दुचाकी चोरल्या

    पुणे: ५० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराने कारागृहातून जामिनावर सुटताच पुन्हा दुचाकी चोरण्यास सुरूवात केली. गेल्या ५ महिन्यात त्याने २५ दुचाकी चोरल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.

    शंकर भरत देवकुळे (३२, रा. मेमाणी वस्ती, उरुळी देवाची) असे या सराईत वाहन चोराचे नाव आहे. त्याने गॅरेज मालकाच्या मदतीने चाेरीच्या गाड्या फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या असल्याचे सांगून त्यांची विक्री केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने त्याला अटक करत, २५ दुचाकी जप्त केल्या.

    पर्वती येथील एक दुचाकी चोरीचा पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते तपास करत होते. या गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून ही चोरी शंकर देवकुळे याने केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणावरून शंकर देवकुळे याला इचलकरंजी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर तो पाच महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटून आला होता.

    पुणे शहर व परिसरातून दुचाकी चोरी करुन तो गाड्यांच्या नंबरप्लेट काढून टाकायचा. त्यानंतर या गाड्या त्याचा ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनील कुदळे (२७, रा. खडकी, ता. दौंड) याला नेऊन देत असे. तो दौंडमधील खडकी येथील भैरवनाथ गॅरेज येथे विक्रीसाठी ठेवत असे. शंकर देवकुळे याचा तुळजापूरचा मित्र याच्याकडे त्याने दिलेल्या २ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच आणखी एका मित्राला विकलेली १ दुचाकी व त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेल्या ४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. अशी एकूण २५ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहनांबाबत पुणे शहर व इतर ठिकाणी वाहन चोरीचे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. उर्वरित ७ वाहनांच्या मालकांचा शोध सुरु आहे.

    शंकर देवकुळे हा सराईत वाहनचोर आहे. त्याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाड्यांचे लॉक जुने झाले आहेत, अशा दुचाकी हेरून डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने तो त्यांची चोरी करायचा. शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुदळे याला ”मी फायनान्स कंपनीत कामाला आहे. हप्ते न भरलेल्या गाड्या ओढून आणतो,” असे सांगत असे. त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता. अनिकेत हा कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे याला साथ देऊन त्या दुचाकी वाहनांचे चेसीस नंबर, व इंजिन नंबर ग्राईंडरने खराब करुन त्या दुचाकी गावातील शेतकऱ्यांना व गरजूंना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून विकत होता.

    सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, सहायक फौजदार मधुकर तुपसौंदर, पोलिस कर्मचारी शंकर वाकसे, संजीव कळंबे, सुजित पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *