- February 16, 2025
- No Comment
किरकोळ वादात ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला जबर मारहाण, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हडपसर: रस्त्यामध्ये चारचाकी गाडी का लावली यावरुन वाद झाला. यावादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हडपर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या माधुरी निखील पवार ( वय ३३, रा. श्रीनाथ निवास, नंदिनी टकले नगर, मांजरी बु. ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तुषार झेंडे (रा. मारी गोल्ड प्लाझा सोसायटी, नंदिनी टकले नगर, मांजरी बु.) या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचारासाठी एका खागसी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी गावात महिला सासु सासरे आणि पतीसह वास्तव्यास आहे. फिर्यादी महलेलचे पती मगरपट्टा येथी एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. आरोपी झेंडे हा त्यांच्या बंगल्याशेजारील सोसायटीमध्ये राहतो. फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख आहे. फिर्यादी माधुरी या शुक्रवारी (दि.१४) त्यांच्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी कॅब बुक केली होती. त्यानुसार कॅब त्यांना घेण्यासाठी बंगल्यासमोर आली. रस्त्यामध्ये थांबल्यानंतर महिला आणि तिचे पती असे दोघे मिळुन कॅबमध्ये त्यांचे सामान ठेवीत असताना, बंगल्याजवळील सोसायटीमध्ये राहणारा आरोपी तुषार झेंडे हा दुचाकीवरुन आला. त्याने कॅब चालकास तुला गाडी निट लावता येत नाही का रस्त्यामध्ये गाडी का लावली, अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी माधुरी यांनी दादा आम्ही दोन मिनिटात जात आहोत असे म्हणाल्यावर तो तेथुन निघाला. पुढे जात गाडीच्या आरशात पाहत बडबड करत होता. त्याचवेळी माधुरी यांच्या पतीने कॅब चालकाला काय बोलणे याची माहिती घेत होते. याचा अंदाज घेत आरोपी झेंडे पुन्हा वळून कॅब जवळ आला. कॅब चालकाला काय विचारतो. असे म्हणून माधूरी यांचे पती आणी झेंडे यांच्यात वाद सुरु झाले. त्यानंतर शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. माधुरी यांच्या पतीने प्रतिकार करताच झेंडेने त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट काढुन माधुरी यांच्या पतीच्या डोक्यावर मारले. त्यात मध्ये आलेल्या माधुरी यांना देखिल माहारण करण्यात आली. हेल्मेटने त्यांच्या मानेवर उजव्या बाजुस मारहाण केली. हा गोंधळ ऐकून माधुरी यांचे सासु व सासरे खाली आले. त्यांनी मध्ये पडुन सोडविण्याचा प्रयत्न केला असता, तुषार झेंडे हेल्मेटने व लाथाबुक्याने मारहाण करत होते. त्यावेळी माधुरी यांनी झेंडेला ढकलुन दिले असता, त्यांने जमीनीवरील दगड उचलुन त्यांना फेकून मारला. तो दगड त्यांच्या डाव्या डोळ्याला लागल्याने रक्त येवू लागले. झेंडे याने मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी झेंडेला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.