• February 16, 2025
  • No Comment

चिंचवडमध्ये भरधाव मोटारीची तीन दुचाकींना धडक, सहा जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर

चिंचवडमध्ये भरधाव मोटारीची तीन दुचाकींना धडक, सहा जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर

    चिंचवड: चिंचवडमधील दळवीनगर येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत एक दुचाकी पुलावरून खाली कोसळली.

    चिंचवडवरून खंडोबा माळ चौकाकडे जाणाऱ्या सोमेश्वर श्रीधर काळे यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात काळे आणि त्यांचे मित्र अक्षय सुरेश बाटे हे गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात एवढ्यावरच थांबला नाही. धडकेनंतरही मोटार चालकाने गाडी न थांबवता पुढे जाऊन राजेंद्र वराडे, शुभदा वराडे, चैतन्य पुराणिक आणि पद्मजा पुराणिक यांच्या दुचाकींनाही धडक दिली. यामुळे वराडे आणि पुराणिक दांपत्य जखमी झाले.

    या अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की एका दुचाकीवरील स्वारांचा तोल सुटून ती थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *