• February 16, 2025
  • No Comment

सिनियर अकाऊंटंट आणि सेल्स एक्सीक्युटिव्ह यांनी मिळून बिस्लेरी कंपनीला घातला 50 लाखांना गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सिनियर अकाऊंटंट आणि सेल्स एक्सीक्युटिव्ह यांनी मिळून बिस्लेरी कंपनीला घातला 50 लाखांना गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सिंहगड रोड: ग्राहकांकडून रोख रक्कमा स्वीकारुन ती रक्कम बँक खात्यात जमा केल्याची बनावट नोंद करुन कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख बनवून बिस्लेरी कंपनीच्या सिनियर अकाऊंटंट आणि सेल्स एक्सीक्युटिव्ह यांनी मिळून कंपनीला ५० लाख ३० हजार ९७० रुपयांना गंडा घातला.

कंपनीने सिस्टिममध्ये चुकीची इंट्री झाल्यास ती दुरुस्त करण्याचे अधिकार सिनिअर अकाऊंटला दिले होते. त्याचा गैरफायदा घेऊन ही फसवणुक झाली आहे. एका महिला अकाऊंटला यातील एका इंट्रीबाबत शंका आल्याने वरिष्ठ पातळीवरुन चौकशीत ही फसवणुक उघड झाली.

याबाबत बिस्लेरी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीचे विभागीय शाखेचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक रवी श्रीकांत जहागीरदार (वय ३९, रा. नर्‍हेगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कंपनीतील तत्कालीन सिनिअर अकाऊंटंट अजय अशोक मोरे (रा. आनंदनगर, सिंहगड रोड) आणि सेल्स एक्सिक्युटिव्ह सचिन नामदेव धोत्रे (रा. दिघी, पिंपरी चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बिस्लेरी इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीच्या वडगाव बुद्रुक येथील विभागीय कार्यालयात १४ मे ते २६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिस्लेरी कंपनीच्या वडगाव बुद्रुक येथील विभागीय कार्यालयात ३० जण काम करतात. अजय मोरे याची सिनिअर अकाऊंटंट पदावर डिसेबर २०१२ पासून नियुक्ती करण्यात आलेली होती. तसेच सचिन धोत्रे याची १४ सप्टेबर २०१८ रोजी सेल्स एक्सिक्युटिव्ह म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. अजय मोरे याच्याकडे सिनिअर अकाऊंटंट म्हणून कंपनीच्या बँक खात्यामध्ये ग्राहकांकडून येणार्‍या रक्कमेची खात्री करुन संबंधित ग्राहकाच्या नावाने कंपनीने त्यांना पुरवलेल्या मायक्रोसॉफ्ट डायनामिक ३६५ या सॉफ्टवेअरच्या आधारे स्वत:च्या लॉगइन आय डीवरुन ग्राहकांच्या पोर्टफोलिओमध्ये नोंदणी करण्याचे काम होते.

 

यामध्ये ग्राहकांकडून आलेल्या पैशांची सिस्टिमध्ये चुकीची इंट्री दुरुस्त करण्यासाठी इंस्ट्री रिव्हर्स केली जाते. त्याचे अधिकारी सिनिअर अकाऊंटंट म्हणून अजय मोरे याला अधिकार होते. सचिन धोत्रे याने प्रत्यक्षात ग्राहकांना भेटणे, त्यांची ऑर्डर प्राप्त करणे व त्यांचेकडून प्राप्त ऑर्डरप्रमाणे सेल्स कोऑर्डिनेटर यांच्या मार्फतीने सिस्टिमध्ये ऑर्डर प्रोसेस करणे व ग्राहकांशी बोलून प्राप्त ऑर्डरची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगणे. तसेच वितरकामार्फतीने पॅकेज ड्रिंकिग वॉटर या मालाची पुर्तता करणे अशा प्रकारे कामाचे स्वरुप होते.

 

कंपनीच्या अकाऊंटं प्रमुख रेश्मा रायकर यांच्या लक्षात आले की, २३ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीच्या सिस्टिममध्ये ५४ लाख ७१ हजार ८४० रुपयांच्या रिव्हर्स इंट्री झाल्याचे दिसले. त्यांनी ही बाब इंदौर येथील सिनिअर अकाऊंटंट मॅनेजर विनय अग्रवाल यांना कळविली. त्यानंतर या दोघांनी संयुक्त चौकशी केली. त्याच प्रकारे २६ नोव्हेबर २०२४ रोजी अजय मोरे हा रजेवर असताना त्याच दिवशी सकाळी ७ लाख ९२ हजार ४७० रुपयांच्या खोट्या इंट्रीज केल्याचे आढळले.

 

वरिष्ठ पातळीवरुन झालेल्या चौकशीत कंपनीचा सेल्स एक्सिक्युटिव्ह कर्मचारी सचिन धोत्रे याच्याशी अजय मोरे याने संगनमत केले. न्यू माई वडेवाले, नाशिक रोड, साई वडेवाले, खेड, शेतकरी फार्म, खेड, सागर हॉटेल, राजगुरुनगर, राणवरा हॉटेल, आणे, श्रेया एंटरप्रायझेस, दिघी, ए जे एन्टरप्रायझेस भोसरी व इत्यादी ग्राहकांना वेळोवेळी अप्रमाणिकपणे बिस्लेरी ड्रिंकिंग वॉटर विक्री करुन त्यांच्याकडून वेळोवेळी ५० लाख ३० हजार ९७० रुपये रोख स्वरुपात प्राप्त केले. या रक्कमेची अजय मोरे याने सॉफ्टवेअरच्या आधारे कंपनीच्या बँक खात्यावर जमा केली, अशा स्वरुपाची खोटी नोंद कंपनीच्या सिस्टिममध्ये केली. त्याचा बँक खात्यावरील रक्कमेशी ताळमेळ साधण्यासाठी कंपनीच्या सिस्टिीममध्ये सिव्हर्स इंट्रीच्या अधिकाराचा गैरवापर करुन बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख बनवला. कंपनीची फसवणुक केली.

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पुढील तपास करीत आहेत.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *