• February 17, 2025
  • No Comment

लोखंडी पहारीने वार करुन खुन, 36 तासात गुन्हा उघडकीस, पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपीला घेतले ताब्यात

लोखंडी पहारीने वार करुन खुन, 36 तासात गुन्हा उघडकीस, पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपीला घेतले ताब्यात

पुणे: दारु पिल्यानंतर लोकांची मती जाते, असे म्हणतात. तसाच काहीसा प्रकार घडला. दारु पित बसले असताना एकमेकांना शिवीगाळ केली गेली. एकाने दुसर्‍याच्या पत्नीवर कॉमेंट केले, त्यामुळे झालेल्या वादात खोलीतील लोखंडी पहारीने वार करुन खुन केला.

त्यानंतर आरोपी पळून गेला. दोन दिवसानंतर वास येऊ लागल्यावर खून झाल्याचे उघडकीस आले. परंतु, खुनाची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनतर मृतदेह सडू लागल्याने त्याची ओळख पटू शकत नव्हती. फक्त तेथे दोन सुतार रहात होते, इतकीच माहिती पोलिसांना मिळू शकली होती. खुन झालेला कोण आणि आरोपी कोण याचा काही पत्ता लागत नव्हता. अशावेळी पोलिसांच्या तपासात रक्ताने भरलेला एक मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आणि मृताची ओळख पटली अन आरोपीचे नाव समजले.

 

भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाऊन आरोपीला पकडून आणले.

 

नयन गोरख प्रसाद (वय ४५, मुळ रा. दुमडा, तहसी तारवारा, जि. सिवान, बिहार) असे खुन झालेल्याचे नाव आहे. तर बिरण सुबल करकर ऊर्फ बिरण सुबल कर्माकर (वय ३०, रा. बजे बिंडोल, बिंडोले, रायगंज, परीयाल, उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही सुतार होते.

 

आंबेगाव पठार येथील तोरणा मोहर बिल्डिंग जवळ एका बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकाच्या डोक्यात मारुन खून केल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. बॉडी डीकंपोज होऊ लागल्याने चेहरा नीट दिसत नव्हता. तेथील कामगारांना विचारल्यावर कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे मयताची ओळख पटणे अवघड झाले होते. त्या खोलीत रक्ताने माखलेला एक मोबाईल पोलिसांना मिळाला. त्यावरुन मयताची ओळख पटविण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी यांना दिले.

 

रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केल्यावर नयन प्रसाद याचा खुन झाल्याचे लक्षात आले. नयन प्रसाद याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात नयन प्रसाद याच्याबरोबर बिरण करकर याचा फोटो मिळाला. हे दोघे या खोलीत रहात असल्याची खात्री झाली. त्यामुळे नयन प्रसाद याचा बिरण याने खून केल्याचे निष्पन्न झाले. तो पश्चिम बंगालला गेल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगालला जाऊन शोध घेतला असता हावडा रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आला. त्याला पश्चिम बंगालमधील हावडा येथील गोलाबारी पोलीस ठाणे येथे १२ फेब्रुवारी रोजी अटक केली.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, गुन्हे निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांनी केली आहे.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *