• February 18, 2025
  • No Comment

धक्कादायक! वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

धक्कादायक! वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

    ताथवडे: ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एका वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपविल्याचे समोर आले आहे.

    सहिती कलुगोटाला रेड्डी (वय २०, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असे तिचे नाव आहे. ती आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय ५४) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे (वय २०, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    सहिती हिच्या आत्महत्येमागील कारण समजू न शकल्याने सुरवातीला पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तिने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज करून ठेवले होते. तसेच काही रेकॉर्डिंग व पुरावे मित्रांना पाठवत स्वतःचा मोबाईल ठेवल्याचे ठिकाण, त्याचा पासवर्डही सांगितला होता. तिच्या मित्र-मैत्रिणींनी हा सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला.

    पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असता, आत्महत्येमागील सत्य समोर आले. त्यामुळे पोलिसांनी डोंगरे याच्यावर सहिती हीस शारीरिक, मानसिक त्रास देऊन, वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *