• February 18, 2025
  • No Comment

वाघोली येथे एक तडीपार आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ६ ची उल्लेखनीय कामगिरी

वाघोली येथे एक तडीपार आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ६ ची उल्लेखनीय कामगिरी

    वाघोली: गुन्हे शाखा युनिट 6 वाघोली हद्दीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार  श्यामकांत विष्णू सातव (वय ४०) रा. डोमखेल वस्ती, आव्हाळवाडी, ता हवेली, जि पुणे येथे राहत्या घरी आला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

    पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार,  आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्यास  दीड वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले होते. आज रोजी तो मिळून आल्याने त्याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 नुसार वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हाचा   तपास करण्यासाठीच वाघोली पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    सदरची कामगीरी मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *