• February 19, 2025
  • No Comment

जीबीएसने २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

जीबीएसने २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

    पुणे: पुण्यामध्ये जीबीएसने आणखी एकाचा बळी घेतला आहे. २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. किरण देशमुख असं या तरुणीचे नाव असून तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.

    या तरुणीच्या मृत्यूनंतर पुण्यात जीबीएस आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० वर पोहचली आहे.

    बारामतीची किरण राजेंद्र देशमुख (२१ वर्षे) या तरुणीचा जीबीएस सिंड्रोम आजाराने मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएस आजाराची लागण झाली होती. तिच्यावर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान तिने प्राण सोडले.

    किरण देशमुख ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. किरण राहत असलेल्या परिसरात जीबीएस आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत. अशामध्ये तिला देखील जीबीएसची लागण झाली. आजारी पडल्यानंतर किरण आपल्या आई-वडिलांकडे म्हणजे बारामतीला गेली. जुलाब आणि अशक्तपणामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील तज्ज्ञांना दाखवले.

    किरणवर बारामतीत उपचार करण्यात आले पण तिला काहीच फरक पडला नाही. तेव्हा तज्ज्ञांना तिच्या लक्षणावरून जीबीएस आजाराबाबत शंका आली आणि त्यांनी किरणला पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

    दरम्यान, पुण्यामध्ये १८३ रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. २८ रुग्ण संशयित आहेत. पुण्यात आतापर्यंत १० जणांचा या आजाराने मृत्यू झाला. ४२ रुग्ण पुणे मनपा, ९४ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. ३२ रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि ३३ रुग्ण पुणे ग्रामीण तसंच १० इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी १३९ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आला आहे. ३९ रुग्ण आयसीयूमध्ये तर १८ व्हेंटिलेटरवर आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *