- February 20, 2025
- No Comment
लोणी काळभोर पोलिसांकडून हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त; 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर: हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्डा लोणी काळभोर पोलिसांनी कोबींग ऑपरेश दरम्यान उध्वस्त केला आहे. या छाप्यात पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून सुमारे 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुकेश करमावत (वय ५०, रा. गणेशनगर, नवरत्न गोडवानजवळ, मंतरवाडी, फुरसुंगी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश पाटील यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोबींग ऑपरेश राबवून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांचे एक पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता.18) रात्री गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार योगेश पाटील यांना रामदरा डोगराच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याच्या बाजुला हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे, अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी तातडीने छापा टाकुन तयार हातभट्टी दारु, रसायन व हातभट्टी तयार करण्या करीता लागणारे साहित्य असा एकूण 11 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र आरोपी मुकेश करमावत याला पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, लोणी काळभोर पोलीस ठाणेच्या तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, रामहरी वनवे, सकटे, कारखीले, पोलीस अंमलदार बाजीराव वीर, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदिप गाडे, चक्रधर शिरगीरे यांच्या पथकाने केली आहे.