• February 20, 2025
  • No Comment

उंड्रीमधून १२ लाखांच्या चार वाहनांसह ६४ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

उंड्रीमधून १२ लाखांच्या चार वाहनांसह ६४ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: अन्न आणि औषध प्रशासन आणि काळेपडळ पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे ६४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि १२ लाखांच्या चार पिकअप गाड्या असा एकूण ७४ लाख ४४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    याप्रकरणी संपतराज पेमाराज चौहान (वय ३८, कोंढवा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार अंबादास उनवणे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्त वार्ता विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या महितीच्या अनुषंगाने काळेपडळ पोलीसांच्या पथकासह संयुक्तरित्या वडाचीवाडी रोड, घुले वस्ती, उंड्री येथील एका गोडावून वर छापा टाकत कारवाई केली. या गोडावूनमध्ये विविध माल वाहतूक गाड्यांमध्ये वेगवेगळ्या ब्रॅंडच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाला गुटखा सापडला. या गोडावूनमधून पोलिसांनी संपतराज पेमाराज चौहान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून ६४ लाख ४४ हजार ६५० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि १२ लाख रुपये किंमतीच्या चार पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या.

    दरम्यान, आरोपी चौहानविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करत आहेत.

    सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे, पोलीस अमंलदार जाधव, पाटील, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *